जगतापवाडीत डोंगरी विकास निधीअंतर्गत काम सुरू

वाघोली- जगतापवाडी (ता. हवेली) येथे डोंगरी विकास निधीअंतर्गत रस्त्याच्या क्रॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते आज (दि. 24) करण्यात आले. यावेळी हवेली तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रोहिदास उंद्रे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव, उपाध्यक्ष गणेश कुटे, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्‍यामशेठ गावडे, शाश्वत फाउंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर जगताप, सामाजिक कार्यकर्ते रामदास शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सारंग इनामदार, अभियंता प्रशांत पवार, माजी उपसरपंच मोहनराव शिंदे, हवेली भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रशांत कोतवाल ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शेडगे, सुधाकर जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष जालिंदर यादव सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, दत्तात्रय जगताप, माजी सदस्य त्र्यंबक जगताप, शांताराम शिंदे, युवा कार्यकर्ते योगेश जगताप, बजरंग चितळकर यांसह विविध मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)