जगण्याच्या हक्कासाठी मनपासमोर फेरीवाला आंदोलन

पिंपरी – फेरीवाला कायदा अस्त्विात येऊनही फेरीवाल्यांना त्यानुसार लाभ मिळत नाही. लाभ तर दूर परंतु कित्येक ठिकाणी फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे जगण्याच्या हक्‍कासाठी लढा देण्याची वेळ आली आहे, असे सांगत महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या स्थापनेपासून फेरीवाले अस्तित्वात आहेत. फेरीवाला कायदा झाला आहे, ही समाधानाची बाब असली तरी शहरात व्यवसाय करणारे हातगाड़ी, टपरी, स्टॉलधारक यांना जो पर्यंत कायद्यानुसार लाभ मिळत नाही, तोपर्यंत लढा देण्याचा निर्धार आंदोलना दरम्यान करण्यात आला.
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे करण्यात आलेल्या आंदोलानात प्रदेश संघटक अनिल बारवकर, कार्याध्यक्ष इरफ़ान चौधरी, उपाध्यक्ष साईनाथ खंडीजोड़, मनपा समिति सदस्य राजेन्द्र वाघचौरे, मनीषा राउत, अरुणा सुतार, समाधान जावळे, बिलाल तांबोळी, सुरेश देड़े, वासुदेव मनुरकर, सय्यद अली, राजेन्द्र जाधव, आयविन फर्नांडिस, फातिमा शेख, नसीमा तंबोळी, खातेजा राजनाळ, सुलोचना मिरपगारे, सरिता वठोरे, नंदा तेलगोटे,अरुण मेहर, पुष्पा सूर्यवंशी, अनिल सुर्यवंशी आदींसह विविध भागातील हातगाड़ी, टपरी धारक उपस्थित होते.
यावेळी बारवकर म्हणाले, पिंपरी चिंचवड मनपाकडून फेरीवाला कायदा धाब्यावर बसवून शहरातील फेरीवाल्यावर कारवाई सुरू आहे. फेरीवाला कायदा असताना जीव मुठीत घेउन जगत आहे. मनीषा राउत म्हणल्या, शहरात हॉकर्स सर्व प्रभागांना आयुक्‍तांनी आदेश देऊनही प्रभागांकडून कार्यवाही होत नाही.
शहर फेरीवाला समितीची बैठक घ्यावी, फेरीवाल्यावरील अन्यायकारक कारवाई थांबवावी, भक्‍ती- शक्‍ती शिल्प पर्यटन स्थळाजवळ होकर्स झोन करण्यात यावे, अन्यायकारक दंड रद्द करा आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन देऊन सह अभियंता राजन पाटील यांच्याशी चर्चा केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)