जगणं समृद्ध करणारी मैत्री….(प्रभात open house)

खरंतर मैत्री हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येकाचं जीवन सुंदर करणारी ही मैत्री
कोणाशी व कधी होईल हे मात्र नक्की नसतं. पण प्रत्येकाच्या जीवनात मैत्रीची ही वेल पसरलेली असते हे मात्र
नक्की असतं.

मैत्री म्हणजे जगण्याचा आधार, मैत्री म्हणजे जगण्याची ओढ आणि मैत्री म्हणजे जगण्याचा विश्वास…हे जगणं
समृद्ध करणारी मैत्री म्हणजे दोन जीवांना एकत्र जोडणारा पूल. आयुष्याच्या या पूलावरुन चालताना प्रत्येक
वळणावर असे अनेक मित्र आपल्याला भेटतात. त्यात अगदी शाळेत असल्या पासून ते आयुष्याच्या उतारवयापर्यंत!
खरंतर या मित्रांमुळेच आपल्या जीवनाला आकार मिळतो व आपण घडतो अथवा बिघडतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या मैत्रीला कोणत्याच सीमारेषा नसतात. त्यामुळे जगातल्या सर्व नात्यात मैत्री हे सर्वोत्तम नातं आहे. आधी
मैत्री होते मग नातं तयार होतं. सध्याच्या काळात मैत्री हे तर जगण्याचं साधनचं बनलं आहे. अगदी घरात सुद्धा
वडिलांची-मुलांशी मैत्री असावी तर आईची-मुलींशी मैत्री असावी असं म्हटलं जातं. म्हणून ‘मैत्री’ हा शब्दच
तुमचं जगणं समृद्ध करु शकतो. ज्या मित्रांमुळे आपले आयुष्य सुंदर बनले त्या सर्व मित्रांना फ्रेंडशिप डे च्या खुप-
खुप शुभेच्छा….

– गंगाधर बनसोडे, पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)