जखमी आलियाची रनबीरला काळजी

रणबीर कपूर आणि आलिया भटचे रिलेशन किती घट्ट आहे, हे अलिकडेच बघायला मिळाले. “ब्रह्मास्त्र’च्या शुटिंगच्यावेळी जखमी झालेली आलिया उपचारांसाठी ज्या क्‍लिनिकमध्ये येते आहे, तेथे रणबीर तिच्या चौकशीसाठी जाऊन पोहोचला होता. त्याने आलियाची चौकशी केली आणि तिला काळजीपूर्वक कारमध्येही बसवले.

“ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर आणि आलिया एकत्र काम करत आहेत. यापूर्वीही याच सिनेमाच्या सेटवर आलिया जखमी झाली होती. आता काही दिवसांपूर्वी ती पुन्हा एकदा जखमी झाली. तेंव्हा स्वतः रणबीर तिला दवाखान्यात घेऊन गेला होता. आलियाच्या पायावर पट्टी बांधली गेली होती आणि तिला पुन्हा काही इजा होऊ नये म्हणून रणबीर तिची काळजी घेत होता. त्यानंतर तो तिच्या चौकशीसाठी तिच्या घरीही गेला होता.

तेंव्हा तिथे उपस्थित असलेल्या मिडीयावाल्यांना त्याने सपशेल टाळले होते. आपल्या कारमध्ये बसून तो निघून गेला. पण त्याचे फोटो आणि व्हिडीओ मात्र व्हायरल झाले. त्यावर काही फॅन्सनी कॉमेंटही केल्या आहेत. रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाच्यानंतर मध्यमांनी आपली दखल घेत रहावे, म्हणून रणबीर आणि आलिया मुद्दाम एकत्र फिरत आहेत, असे एका फॅनने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)