जंतरमंतर येथील घटनेचा लोणंदमध्ये निषेध

लोणंद : लोणंद पोलिस ठाण्यात निवेदन देताना आरपीआयचे कार्यकर्ते

आरपीआयच्यावतीने पोलिसांना निवेदन
लोणंद, दि. 12 (प्रतिनिधी) – लोणंद पोलिस ठाण्यात लोणंद आरपीआयच्यावतीने संविधान जाळणाऱ्या व महापुरूषांचा अवमान करणाऱ्या व अपमानास्पद घोषणा देणाऱ्यावर कडक शासन करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
9 ऑगस्ट रोजी जंतरमंतर, दिल्ली येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाचे जाळून तसेच महापुरूषांविषयी आक्षेपार्ह अशा घोषणा दिल्या. या घटनेचा निषेध करण्यासाठी लोणंद पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक गणेश पवार यांना पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी शाखा प्रमुख भुषण खरात, अध्यक्ष सागर खरात, प्रमोद रणदिवे, दिलीप वाघमारे, स्वप्निल दगडे, बाळा खरात, बापू ढावरे, राजेश भाटिया, रमेश ननावरे, अनिल जगताप, इंद्रजित खरात, किरण मोरे, अजिंक्‍य खरात, अविनाश गायकवाड, संतोष पोटफोडे, बबलू सय्यद, वैभव रणखांबे, आकाश खरात, कल्याण झेंडे, सुमित खरात, अक्षय दगडे, बाळासाहेब कोथळे, गणेश माने, शरद अडसुळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)