जंगम गुरुजींचा आदर्श प्रेरणादायी : आनंदराव पाटील

सातारा : शालेय उपयोगी साहित्याचे वितरण करताना आमदार आनंदराव पाटील, राजेश क्षीरसागर, समीर जंगम, डॉ. रविंद्र भारती-झुटिंग, काम्रेड किरण माने इत्यादी.

सातारा, दि. 4 (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य नेते बाबूराव जंगम (गुरुजी) यांचे स्वातंत्र्य चळवळीतील आणि स्वातंत्र्य उत्तर काळातील योगदानाचे मूल्य कशात ही जोगता येणार नाही. असे प्रतिपादन सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांनी केले.
ते सातारा येथील हुतात्मा स्मारकात ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जंगम गुरुजी यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्य सैनिक बाबूराव जंगम (गुरुजी) स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने शाळांना साहित्य वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर,काम्रेड किरण माने, ऍड. विजयराव कणसे, प्रकाश गवळी, डॉ. रविंद्र भारती- झुटींग, समीर जंगम, हे प्रमुख उपस्थीत होते. पाटील यांनी प्रतिष्ठानला सर्व ते सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले. राजेश क्षीरसागर म्हणाले गुरुजींनी नोकरीच्या माध्यमातून सेवा दिलेल्या शाळांना आवश्‍यक असणारे शालेय साहित्य देऊन प्रतिष्ठानने व जंगम कुटूंबियांनी इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. गुरुजींचा वारसा पुढे चालवण्याचे काम आजचे शिक्षकांना नक्की करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. काम्रेड किरण माने यांनी जंगम गुरुजींच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी केळघर शाळेस यूपीस, आझादपूर शाळेस प्रिंटर, पिंपोडे खुर्द शाळेस फॅन, पिंपोडे बु। शाळेस स्मार्ट टीव्ही, भाडली शाळेस स्मार्ट टीव्ही देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचलन प्रतिष्ठानचे अध्यक्ष समीर जंगम तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे सचिव डॉ. रविंद्र भारती- झुटींग यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शाळांचे शिक्षक, कर्मचारी, जंगम कुटुंबीय, सातारा शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)