छ. संभाजी महाराज पतसंस्थेच्यावतीने बाळासाहेब सोळस्कर यांचा सत्कार

पिपोंडे – सोळशी, ता. कोरेगांव येथील व मुंबई बाजार समितीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळस्कर यांची राष्ट्रवावादी कॉंग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पिंपोंडे बु. येथील छ. संभाजी महाराज पंतसंस्थेच्यावतीने संस्थांपक रामभाऊ लेभे, सुरेश सांळुखे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

यावेळी संस्थेचे माजी चेअरमन सुरेश साळुंखे म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे विश्‍वासू म्हणून सोळस्कर यांची ओळख आहे तर माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, ना. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेले सोळस्कर यांच्या निवडीमुळे आगामी निवडणुकीसाठी त्यांचा फायदा होणार आहे. यापुर्वी बाळासाहेब सोळस्कर यांनी विविध सहकारी संस्थावर काम केले आहे.

-Ads-

त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणा मधील गाढा अभ्यास आहे. सोळस्करांच्या निवडीमुळे उत्तर कोरेगावाला चांगले नेतृत्व मिळाले असल्याचे सुरेश साळुंखे म्हणाले. संस्थापक रामभाऊ लेंभे, माजी प. स. सदस्य अशोकराव लेंभे, रावसाहेब लेंभे, हणमंतराव पवार, भरत सांळुखे यासह सर्व संचालक व मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)