पिपोंडे बुद्रुक ःवृक्षारोपणप्रसंगी छ. संभाजी महाराज पतसंस्थेचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ.

पिपोंडे बु, दि. 12 (वार्ताहर)- पिपोंडे बुद्रुक, ता. कोरेगाव येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेच्यावतीने जिल्हा उपनिबंधक अष्टेकर, संजय सुद्रीक, संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्याच्या बांधावर गावामधील रस्त्याच्या बाजुने, माळरानावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वड, आंबा, पिंपळ, चिंच, करंज, जांभुळ, गुलमोहर, सावर, लिंब, शिस यासह सुमारे एक हजार झाडे लावण्यात आली. यावेळी अष्टेकर म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व भावी पिढीचे आरोग्य चांगल्या प्रकारे राहण्यासाठी वृक्ष लागवड केली पाहिजे. वृक्षारोपण ही काळाची गरज असून झाडे लावण्यास लोकांना प्रवृत्त करावे. झाडे लावल्यानंतर त्यांचा फायदा कसा होतो हे लोकांना पटवून सांगितले पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी माजी चेअरमन सुरेशबापु साळुंखे, अशोकराव लेंभे, रावसाहेब लेंभे, सोपान चव्हाण, टि.एन. ढमाळ, अशोक पवार, हणमंत पवार, व्यवस्थापक अशोक लेंभे यांच्यासह, सर्व संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)