छ. संभाजी पतसंस्थेची प्रगतीची घौडदौड कायम

पिंपोडे बुद्रुक – प्रतिकुल परिस्थिती असताना देखील छ. संभाजी पतसंस्थेची प्रगतीकडे वाटचाल होत आहे. या पतसंस्थेने 2017 – 2018 या आर्थिक वर्षात 657 कोटींचा संमिश्र व्यवसाय करून सामान्य ग्राहकांचा विश्‍वास जपल्याची माहिती संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी दिली. छ. संभाजी पतसंस्थेच्या 31 मार्च अखेरच्या सांपत्तिक स्थितीची माहिती मुख्य कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत लेंभे यांनी दिली. कुशल कर्मचारी व आपुलकीच्या बॅंकेच्या सेवेच्या जोरावर तसेच सर्वसामान्य सभासद हाच केंद्रबिंदू मानून काम केल्याने छ. संभाजी पतसंस्थेची प्रगतीची घौडदौड कायम चालू आहे. पतसंस्थेच्या 52 शाखा आणि 7 विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून गतवर्षीपेक्षा 80 कोटी रुपयांचा अधिक व्यवसाय करून या आर्थिक वर्षात 656 कोटी 49 लाख रुपयांचा समिश्र व्यवसाय केला आहे. पतसंस्थेकडे 384 कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. 42 कोटी रुपयांच्या ठेवी वाढल्या आहेत. 274 कोटी रुपयांचे कर्जवाटप, 111 कोटी 5 लाखांची गुंतवणूक 2 कोटी 6 लाखांचा नफा, 67 टक्‍के सीडीआर रेशो, 6.65 टक्‍के ग्रॉस एनपीए, 4.97 टक्‍के नेट एनपीए, 9.81 सीआरएआर, 38 कोटी 41 लाखांचा स्वनिधी, 435 कोटी 57 लाख रूपयांचे खेळते भांडवल आहे. सर्व शाखा संगणकीकृत असून ऑनलाइन सेवा दिल्या जात आहेत. पतसंस्था सामान्य सभासद व ग्राहकांना बॅंकीग सेवा देण्यास तत्पर राहिल, असे रामभाऊ लेंभे म्हणाले. चेअरमन रावसाहेब लेंभे, व्हाईस चेअरमन जयवंतराव घोरपडे, अशोकराव लेंभे, सुरेशराव साळुंखे, संचालक, प्रभारी व्यवस्थापक अशोक लेंभे, अकाऊंट विभागाचे संजय कोठावळे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)