छ. शाहु महाराजांचे बहुजन समाजासाठी मोठे कार्य : इंगवले

 

पाटण, दि. 27 (प्रतिनिधी) – छत्रपती शाहु महाराजांनी बहुजन समाजासाठी मोठे कार्य केले आहे. बहुजन समाजाच्या उन्नतीचा ध्यास घेतलेल्या शाहु महाराजांनी जाती व्यवस्था रूढी परंपरा मोडीत काढण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर छत्रपती राजर्षी शाहु महाराज यांचा राज्य कारभार लोककल्याणकारी होता, असे प्रतिपादन ग्रंथपाल संजय इंगवले यांनी केले.
नागोजीराव स्मारक वाचनालयाच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहु महाराजांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच चंद्रकांत मोरे, यशवंतराव जगताप, सुर्यकांत पाटणकर यांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज नंतर लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शाहु महाराजांचा उल्लेख जागाच्या इतिहासात पहावयास मिळतो. समाजाची शैक्षणिक दृष्ट्या प्रगती होण्यासाठी जाहीरनामा काढून शिक्षण सक्‍तीचे व मोफत केले. त्यासाठी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शाळा वसतिगृहांची निर्मिती केली. या अशा महापुरुषांच्या जयंती निमित्ताने समाजाने त्यांचे गुण अंगीकारावे असेही अवाहन त्यांनी केले.
यावेळी ग्रंथपाल लक्ष्मण घाडगे, कृष्णत देसाई, प्रदीप खांडगे, विजय शेडगे, रामभाऊ राऊत, सभासद, वाचक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)