छोट्या उद्योगांना बाजारपेठ मिळणार

मुंबई- केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या कुटीर उद्योग महामंडळांशी संलग्न असलेल्या उद्योगांच्या उत्पादनांसाठी ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. याअंतर्गत केंद्रीय कुटीर उद्योग एम्पोरिअमने (सीसीआयई) अमॅझॉनशी करार केला. सीसीआयईद्वारे ग्रामीण भागातील कारागीर व विणकर यांच्या उत्पादनांची विक्री केली जाते.

आता अमॅझॉनशी केलेल्या करारामुळे ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या सिल्क व खादीच्या साड्या, चादरी, धातूच्या वस्तू व अन्य हस्तकलेची उत्पादने या माध्यमातून लाखो ग्राहकांना खरेदी करता येतील. यातून ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळू शकणार आहे. भारतीय हस्तकला व हातमागाच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)