मुंबई – इंडीफी टेक्नोलॉजीजने एसएमईंना निधी उपलब्ध करून देण्याकरिता नवीन सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत छोट्या उद्योगांना त्यांच्याकडील अद्याप चुकत्या न झालेल्या (अनपेड) दोन कोटी रुपयांपर्यंतच्या बिलांवर हा मंच कर्ज देतो. ही बिले चुकती झाल्यानंतर लगेच उद्योगांनी परतफेड करणे अपेक्षित असते. गेल्या सहा महिन्यात पूर्तता न झालेल्या बिलांवर आधारित कर्ज उत्पादनामध्ये सात पटींनी वाढ झाली आहे.
इंडिफी टेक्नोलॉजीजचे अध्यक्ष राणा विक्रम आनंद म्हणाले, या सुविधेखाली, उद्योजक त्यांची पूर्तता न झालेली बिले इंडिफीकडे सादर करू शकतात आणि त्या बिलांच्या रकमेच्या 80 टक्के रक्क्म कर्जाऊ उचलू शकतात. एक वर्षाहून कमी काळापासून सक्रिय असलेले उद्योग अशा प्रकारे कमीत कमी कागदपत्रे सादर करून 48 तासांत कर्ज प्राप्त करू शकतात. या सुविधेमध्ये आगाऊ परतफेडीसाठी कोणतेही शुल्क लावले जात नाही.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा