छोट्या ऍनीची ‘मोठी गगनभरारी’

आयुष्य जगत असताना आपल्या समोर काही जणांच्या गोष्टी अशा समोर येतात ज्यांच्यावर सहजपणे विश्वास ठेवणे कठीण होते. कारण त्या गोष्टीतील त्यांचा संघर्ष आपल्याला नवी प्रेरणा देऊन जातो. अशीच एक प्रेरणादायी कथा आहे जगातील वयाने सर्वात लहान असणाऱ्या महिला वैमानिक असणाऱ्या ऍनी दिव्याची….वयाच्या केवळ १९ व्या वर्षी तिने बोइंग 777 हे विमान उडवून तिने सर्वांसमोर नवा आर्दश निर्माण केला आहे. रस्ता कितीही कठीण असला तरी आपली इच्छाशक्ती मजबूत असेल तर आपले स्वप्न सत्यात उतरवण्यास कोणीही रोखू शकत नाही हे तिच्या या कामगिरीनेच सिद्ध केले आहे.

पठानकोटमध्ये जन्मलेल्या ऍनीला लहानपणीच पायलट बनण्याची इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने लहानपणापासून खूप मेहनत घेतली. कारण आपले उद्दीष्टे साध्य करण्यासाठी तिला प्रवास करणे सोपे नव्हते.  तिचा जन्म पंजाबच्या पठानचेकोटमध्ये झाला. ऍनीचे वडील सैन्यात उच्च पदावर कामावर होते. पठाणकोटमध्येच त्यांना तैनात करण्यात आले होते. त्यामुळे ऍनीचे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. परंतु, ऍनीच्या वडिलांनी स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेतली आणि विजयवाडा येथे स्थायिक झाले. दरम्यान, विजयवाडामध्ये स्थायिक झाल्यानंतर तिचे शालेय शिक्षण तिथेच पूर्ण झाले. दरम्यान, लहानपणीच आपल्याला काय बनायचे आहे हे ऍनीने ठरवले असल्याने तिचे ध्येय निश्चित होते.

एकीकडे तिच्यासोबत शिक्षण घेणारे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी धडपड करत होते त्यावेळी ऍनी तिच्या पायलट बनण्याचे स्वप्न पाहत होती. विशेष म्हणजे तिचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या घरच्यांनी तिला मानसिक आणि सर्वच बाजूने पाठबळ दिले. त्यांनी तिच्यावर कधीच त्यांच्या स्वप्नाची जबरदस्ती केली नाही. परंतु, तिच्या नातेवाईक आणि जवळच्या मित्रांना तिचा पायलट बनण्याचा निर्णय कधीच आवडला नाही. परंतु, ऍनीने त्याकडे नेहमी दुर्लक्ष केले.
ऍनीच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. तरीपण तिच्या पालकांनी तिला तिच्या स्वप्नासाठी कधीच कमी पडू दिले नाही.

ऍनीचे संपूर्ण लहानपण विजयवाडामध्येच गेले. ती इंग्रजी लिहू आणि इंग्रजी वाचू शकत होती, परंतु इंग्रजी बोलणे तिच्यासाठी एक मोठे आव्हान होते ज्यावर तिने तेवढ्याच जिद्दीने मात केली. दरम्यान, वयाच्या 12 व्या वर्षापासून ते 17 वर्षांपर्यंत अॅन्नी इंदिरा गांधी राष्ट्रीय उरण अकादमी (आयजीआरयूए),  उत्तर प्रदेशातील फ्लाइंग स्कूलमधून शिकली.. यावेळी तिच्या इंग्रजी बोलण्यावर तिची अनेकवेळा थट्टा करण्यात येत होती. या त्रासाला कंटाळून तिने माघार घेण्याचा देखील विचार केला होता. परंतु, ऍनीच्या शिक्षणासाठी तिच्या कुटुंबीयांनी कर्ज घेतले. तेच लक्षात ठेवून तिने शिष्यवृत्ती जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि ती मिळवली. एका लहानशा शहरापासून एका मोठ्या शहरापर्यंतचा सांस्कृतिक बदल अॅन्नीसाठी खूप चांगला होता.

दरम्यान, ऍनीने वयाच्या 19 व्या वर्षी प्रशिक्षण पूर्ण केले.  यावेळी लगेच तिला एअर इंडियाची नोकरी मिळाली. त्या काळात प्रथमच पहिल्यांदाच परदेशात गेली…कारण तिला पुढचे प्रशिक्षण देण्यासाठी स्पेनला पाठवण्यात आले.  जेव्हा ऍनी परतली तेव्हा तिला बोईंग 737 उडण्याची संधी मिळाली. आणि याच संधीचे सोने अॅन्नीने केले. तेव्हापासून ते आजपर्यंत ऍनीने पुन्हा कधीच मागे वळून बघितले नाही. आज वयाच्या 21 व्या वर्षीदेखील पुढील प्रशिक्षणासाठी लंडनला पाठवण्यात आले. तेव्हा बोईंग 777 उडण्यास सुरुवात केली. दरम्यान, तेव्हापासून तिचे आयुष्य बदलले आहे. तिच्या आयुष्यातील आजपर्यंतचा प्रवास हा तिच्यासाठी आणि इतरांसाठी आर्दश निर्माण करणारा आहे.

दरम्यान, या वैमानिक क्षेत्रात अजूनही पुरुष वर्चस्व असले तरी, या व्यवसायात महिलांनी पुरुषांचे वर्चस्व मोडीत काढले आहे. हे ऍनीवरून सिद्ध होते.  दरम्यान, भारताने विकसित देशांसह उर्वरित जगावर वैमानिक क्षेत्रात आघाडी घेतली आहे. भारतामध्ये 15% महिला विमान वैमानिक म्हणून उड्डाण करतात, तर जगभरात तीच  संख्या सरासरी 5% आहे. त्यामुळे भारतात महिला वैमानिकांना चांगले दिवस आले असल्याचे दिसत आहे. तसेच आपले पालक हेच आपले मोठे समर्थक आहेत हे ऍनीच्या पालकांवरून सिद्ध होते. तसेच कष्ट केल्याशिवाय यशाला पर्याय नाही हेच अॅन्नी दिव्याच्या यशस्वी कारकिर्दीवरून स्पष्ट होते….

– किरण दीक्षित


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)