छोट्याछोट्या गोष्टीत विनोद शोधा

राजगुरूनगर- रोजचा दिवस नव्याने जगा, छोट्या छोट्या गोष्टीत विनोद शोधा व मनमुराद हसा असा मोलाचा उपदेश प्रसिद्ध व्याख्याते तथा प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी दिला.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त शब्दब्रह्म करिअर्स च्यावतीने सुप्रसिद्ध व्याख्याते व प्रवचनकार डॉ.संजय उपाध्ये यांचा मन हलकं करणारा दिलखुलास कार्यक्रम “मन करा रे प्रसन्न’ याचे आयोजन राजगुरुनगर येथे करण्यात आले होते. शब्दब्रम्ह करिअर्सच्या विद्यार्थ्यांनी भाषणकौशल्य व सूत्रसंचालनचा कोर्स यशस्विरित्या पूर्ण केला आहे अशा 39 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले. त्यावेळी डॉ.उपाध्यय बोलत होते. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, सुरेखा मोहिते पाटील, खेड बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले, राजगुरुनगर बॅंकेचे अध्यक्ष गणेश थिगळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष कैला सांडभोर, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय डोळस, माजी नगराध्यक्ष बापु थिगळे, यांच्यासह खेड बाजार समिती, रोटरी क्‍लब, चैतन्य संस्था, महिला मंडळ, ब्राह्मण सेवा संघ, ज्येष्ठ नागरिक संघ, ग्राहक हक्क समिती, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी, शब्दब्रम्ह करिअर्सचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय उपाध्ये यांनी आपल्या मार्गदर्शनातून राजगुरूनगर वासियांना जगण्याचा एक नवा मंत्र देवून मंत्रमुग्ध केले. झालं गेलं विसरुन जा, रोजचा दिवस नव्याने जगा, छोट्या छोट्या गोष्टीत विनोद शोधा व मनमुराद हसा अशा अनेक विनोदी किस्स्यांद्वारे रसिक प्रेक्षकांचे मन खरोखरच प्रसन्न करण्याचे कार्य डॉ.उपाध्ये यांनी केले. शब्दब्रह्मचे संस्थापक व प्रसिद्ध निवेदक सुनिल थिगळे यांनी प्रास्ताविक तर संस्थापिका व निवेदिका पूजा थिगळे यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.

  • भाषणकौशल्य व सूत्रसंचालन ही आजच्या काळाची गरज बनली आहे. आपल्या पुणे जिल्ह्यात सूत्रसंचालन या क्षेत्राला व्यवसायिक रुप देवुन या क्षेत्राची उंची वाढविण्याचे कार्य सुप्रसिद्ध निवेदक सुनील थिगळे व त्यांची कन्या पूजा थिगळे यांनी केले आहे. खेड तालुक्‍याचा सांस्कृतिक विकास वेळोवेळी साधला आहे.
    – दिलीप मोहिते पाटील, माजी आमदारद

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)