छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेला नवी मुंबईत नो एन्ट्री !

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा भाऊ दिपक निकाळजेला अटकेपासून मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. ११ जूनपर्यंत निकाळजेला अटक न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र अटकेपासून दिलासा देताना उच्च न्यायालयाने पीडीत मुलगी राहत असलेल्या नवी मुंबईत निकाळजेला प्रवेश बंदी केली आहे. गरज असल्यास तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच दिपक निकाळजेला नवी मुंबईत प्रवेश करता येईल.

पनवेल पोलीस स्थानकात निकाळजेविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. साल २०१४ पासून तक्रारदाराशी संबंध असल्याने संगनमतानेच शरीरसंबंध ठेवल्याचा याचिकाकर्त्यानी न्यायालयात दावा केला आहे. साल २०१४ ते २०१८ या काळात सदर तरुणी आपल्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. आपल्याशी लग्न न केल्यास या संबंधांची माहीती माझ्या पत्नीला देण्याची धमकीही ही तरुणी देत असे अशी माहीती निकाळजेने न्यायालयाला दिली. दरम्यान ती आपल्यासोबत एकदा काश्मिरलाही आली होती. असा दावाही निकाळजेच्यावतीने उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने दीपक निकाळजेला अटक न करण्याचा आदेश दिला असला तरी त्याला नवी मुंबईत प्रवेश बंदी करण्यात आला आहे. पीडीत मुलगी नवी मुंबईत राहत असल्याने कोर्टाने दीपक निकाळजेवर प्रवेश बंदी घातली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)