छिंदमसारख्या औलादी पोसणाऱ्या भाजपला पैशाचा माज

धनंजय मुंडे यांची टीका ः भाजप आता “पार्टी विथ क्रिमिनल’ झाल्याचाही आरोप

नगर – “शिवद्रोही श्रीपाद छिंदमसारख्या औलादी पोसरणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पैसा माज आला आहे. ही प्रवृत्ती मतदारच ठेचू शकते. केंद्र व राज्यातील भाजप सरकार मतदारांच्या फसवणुकीचा कार्यक्रम राबवित आहे. या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तेच होत आहे. प्रदेशाध्यक्ष दानवे यांची लायकी नसताना विकासाचे गाजर दाखवून तीनशे कोटी देतो, असे सांगून नगरकरांची पुन्हा फसवणूक करत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्याच मागे नाहीत. धुळ्याच्या प्रचार सभेत त्यांना एक हजार कोटी देतो, असे सांगितले. मग नगरसाठी तीनशे कोटी का, असा “डिफरन्स’ का? असा सवाल करत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता पक्ष हा “पार्टी विथ डिफरन्स’ नसून “पार्टी विथ क्रिमिनल’ झाली आहे, अशी टीका केली आहे.

राष्ट्रवादी, कॉंग्रेस, कम्युनिस्ट, युनायटेड आरपीआय महाआघाडीच्या सावेडीतील भिस्तबाग चौकात आयोजित केलेल्या प्रचार सांगतेच्या सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे, कॉंग्रेसचे नेते डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, संग्राम कोते पाटील, आण्णासाहेब शेलार, प्रा. माणिकराव विधाते, बाळासाहेब भुजबळ, किसनराव लोटके, अशोक गायकवाड, निर्मला मालपाणी, सविता मोरे आदी यावेळी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, “महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपमान उपमहापौर छिंदम याने भाजपमध्ये असताना केला. हा शिवद्रोही आता अपक्ष म्हणून उभा राहिला आहे. भाजपनेच त्याला उभे केले आहे. भाजपचेच कार्यकर्ते त्याचा प्रचार करत आहेत. हे सर्व पैशाच्या जोरावर चालले आहे. ज्याची लायकी नाही, ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष दानवे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नगरसाठी तीनशे कोटी देतो, अशी भाषा करत आहेत.

केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार महागाईच्यानिमित्ताने सर्वसामान्यांच्या खिशावर रोज दरोडा टाकत आहेत. ते काय नगरच्या विकासासाठी तीनशे कोटी देणार? असा सवालही त्यांनी केला.’ नगर शहराचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा 15 वर्षापासून खासदार आहे. शिवसेनेचा 25 वर्षापासून आमदार होता. या खासदार, आमदाराची नगर शहर विकासाची जबाबदारी असताना ती त्यांनी निभावली नसल्यानेच नगरचा विकास खुटल्यांचे ते म्हणाले.

खासदार गांधी हे उड्डाण पुलाचे गाजर दाखवित आहे. या गाजराचा आता हलवा झाला आहे. तरी देखील उड्डाणपूल होईना झाला आहे, अशी टीका करत मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नगरमधील प्रचार सभेत गर्दी कमी झाल्याचे सांगून चांगलीच खिल्ली उडवली. राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. साईंच्या झोळीवर देखील हात मारू लागले आहेत. याच सरकारच्या काळात भिडेसारखा व्यक्ती संत तुकाराम यांच्यापेक्षा मनूश्रेष्ठ आहे, हे सांगत सुटला आहे.

याच भाजप सरकारच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान धोक्‍यात आले आहे. देशाच्या राजधानीत या संविधानाची प्रत जाळली जाते हे दुर्दैवी आहे. या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला त्याची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. लाटेल आलेल्यांची वाटच लागते. नगरकरांच्या मताचा आवाज दिल्लीपर्यंत जाणार आहे, असा विश्‍वासही मुंडे यांनी व्यक्त केला.

पोलिसांची शहरात दहशत
या महापालिकेच्या निवडणुकीत पोलीस दलाचा वापर राज्यातील सरकार भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यासारखा करत आहेत. उमेदवारांवर दडपण आणले जात आहे. शहरात पोलिसांची दहशत आहे. ती खपवून घेणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रकाराचे उत्तर कसे द्यायचे हे जाणते, असा इशारा धनंजय मुंडे यांनी सरकार आणि प्रशासनाला दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
108 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
2 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)