छिंदमला चोप देणाऱ्या शिवसेनेच्या आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

नगर – शिवसेनेला मतदानासाठी हात उंच केल्यानंतर शिवद्रोही श्रीपाद छिंदम याला नगरसेवकांनी सभागृहात चोप दिल्या. त्यानंतर छिंदम याने तोफखाना पोलिसांकडे आठ नगरसेवकांविरोधात तक्रार देत फिर्याद दिली. छिंदमच्या फिर्यादीनुसार नगरसेवक योगीराज गाडे, विजय पठारे, अमोल ऊर्फ ज्ञानेश्‍वर येवले, अनिल शिंदे यांच्यासह इतर चार, अशा एकूण आठ जणांविरोधात तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी 28 डिसेंबरला मतदान होणार होते. यासाठी नगर विकास कार्यालयाने मतदानासाठी नोटीस बजावली होती. मतदानाच्या आदल्यादिवशी शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार यांनी मला मतदान करा, अशी विनंती केली होती. त्यानुसार शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याची वेळी आली, त्यावेळी आपण हात वर केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेनेचे अमोल येवले आणि विजय पठारे यांनी माझ्या दिशेने धाव घेऊन आमच्या उमेदवाराला मतदान करू नको असे म्हणून मतदान करताना अडवून मारहाण केली. यावेळी योगीराज गाडे आणि अनिल शिंदे यांच्यासह इतर चौघांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. मारहाण होत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या दिशेने जाऊन थांबलो, असे छिंदम याने फिर्यादीत म्हटले आहे. सभागृहाबाहेर ये, तुला खल्लासच करतो, अशी धमकी यावेळी मला देण्यात येत होत्या. मतदानाच्या हक्कापासून मला वंचित ठेवण्याचा प्रकार केला. जीवे मारण्याची धमकी दिल्याचे छिंदम याने फिर्यादीत म्हटले आहे.

छिंदमचे मतदान ग्राह्य धरू नये

शिवद्रोही श्रीपाद छिंदम याचे मतदान शिवसेनेला होण्याची शक्‍यता आहे. ती लक्षात घेऊन शिवसेनेचे गटनेता रोहिणी शेंडगे यांनी पीठासीन अधिकारी, प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना छिंदमने शिवसेनेला मतदान केल्यास ते ग्राह्य धरू नये, असे पत्र दिले होते. या पत्र देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. छिंदमने यावरही शिवसेनेला मतदान केले आहे. छिंदम यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी चोप दिला आहे. दरम्यान, छिंदमने शिवसेनेला मतदान केल्याने ते पीठासीन अधिकारी यांनी ते ग्राह्य धरले आहे. छिंदमचे मतदानामुळे शिवसेनेने बहिष्कार घालू देखील बाळासाहेब बोराटे यांना महापौरपदाच्या निवडणुकीत आठ मते मिळाली आहेत.

बोराटे यांचा कॉल छिंदमकडून व्हायरल

शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार बाळासाहेब बोराटे यांनी मला मतदान करावे, याचा मोबाईल कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावा श्रीपाद छिंदम याने केला आहे. या कॉल रेकॉर्डिंगची ऑडिओ क्‍लीप देखील व्हायरल करण्यात आली आहे. मतदानासाठी मला पाच मोबाईल कॉल झाले असून, ते पाचही कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावा छिंदम याने केला आहे. बाळासाहेब बोराटे यांनी मात्र छिंदम याचे मत देण्यासाठी आपण कोतणाही कॉल त्याला केला नव्हता. तसे असते, त्याने मतदानापूर्वीच ऑडिओ क्‍लीप व्हायरल करायची होती. भारतीय जनता पक्षा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची ही खेळी असून, शिवसेना आणि आपल्याला बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोपही बोराटे यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)