छिंदमचे नगरसेवक पद रद्द करा !

संभाजी बिग्रेडसह शिवप्रेमींची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

नगर: खेळाडू पैलवान अंजली वल्लाकटी यांचा शिवछत्रपती पुरस्कार मागे घ्या. शिवद्रोही श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द झाले पाहिजे. संभाजी बिग्रेडच्या कार्यकर्त्यांसह शिवप्रेमींच्या या मागणीने जिल्हाप्रशासनाचे कार्यालय आज दणाणून गेले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या निवडणुका नकुताच पार पडल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द बोलणार श्रीपाद छिंदम या निवडणुकीत विजयी झाला आहे. प्रभाग नऊ (क) मधून तो निवडून आला आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त पैलवान अंजली वल्लाकट्टी प्रभाग नऊ (ड) मधूनच निवडणूक लढवली आहे. श्रीपादचा भाऊ श्रीकांत याने मतदान प्रक्रियेपूर्वी यंत्राची पूजा केली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविणारी पैलवान अंजली वल्लाकट्टी या देखील पूजेत सहभागी झाल्या होत्या. राज्याचे अराध्य दैवत शिवछत्रपती यांच्याविषयी अपशब्द ज्याने वापरले तो श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत हा मतदान यंत्राची पूजा करत असताना पैलवान वल्लाकट्टी त्यात सहभागी झाल्या होत्या. वल्लाकट्टी यांची ही कृती म्हणजे शिवाजी महाराज यांचा अपमान आहे. त्यामुळे त्यांना राज्य सरकारने दिलेला शिवछत्रपती क्राडी पुरस्कार मागे घ्यावा, अशी मागणी निदर्शने करताना शिवप्रेमींनी केली.

मतदान यंत्रणाची पूजा करताना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अंजली वल्लाकट्टी या देखील तिथे उभ्या होत्या. याचा अर्थ भाजपचे छिंदमबरोबर साटेलोटे होते, असे दिसते आहे. या पूजेत सहभागी झालेल्या पैलवान वल्लाकट्टी, पुरोहित आणि छिंदमबरोबर असलेले इतरांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. श्रीपाद छिंदम हा शिवद्रोहीच आहे. नगरमधून तो पुन्हा हा निवडून आला आहे. तो नगरसेवक असताना महापालिकेने त्याविरोधात अविश्‍वास ठराव मंजूर केला होता. राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे तो सादर आहे. त्यावर सुनावणी देखील झाली आहे. परंतु त्यावर निर्णय झाला नाही. हा निर्णय जाणिवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आला होता. त्यामुळेच छिंदम हा पुन्हा निवडणुकीला उभा राहिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीच हा प्रकार केल्याचा आरोप शिवप्रेमींकडून निदर्शनावेळी करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.


महापौर निवडणुकीच्या वेळी छिंदम सभागृहात येणारच आहे. त्यावेळी शिवप्रेमींचा उद्रेक झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहणार आहे. श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद झाल्यानंतर महापौर पदाची निवडणूक घ्यावी. पैलवान अंजली वल्लाकट्टी यांनी श्रीकांत छिंदमने मतदान यंत्राच्या पूजेत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊन त्यांचा पुरस्कार सरकारने मागे घ्यावा.

– रेखा जरे पाटील
जिल्हाध्यक्ष, यशस्वनी बिग्रेड


छत्रपतींचा अपमान हा राज्याचा अपमान आहे. श्रीपाद छिंदम निवडून येणे हे नगरकरांसाठी लाजिरवाणे आहे. मतदानाची विक्री झाली आहे. छिंदम याच्या मालमत्तेची चौकशी व्हावी. त्यावर राज्याबाहेर हद्दपारीची कारवाई व्हावी. पैलवान अंजली वल्लाकट्टी या देखील मतदान यंत्रेत स्वतःहून सहभागी झाल्याचे समोर येत आहे. त्यांच्यासह पुरोहितावर देखील गुन्हा नोंदवावा.
– गोरख दळवी,
जिल्हाध्यक्ष, संभाजी बिग्रेड


श्रीपाद छिंदमने कितीही नतमस्तक होऊ दे, त्याने राज्याच्या अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. काही लोकप्रतिनिधी त्याला पाठिशी घालत आहेत. हा राजांचा अपमान आहे. छिंदमचे नगरसेवक पद रद्दचा पुन्हा ठराव होऊन त्यावर कारवाई झाली पाहिजे. अंजली वल्लाकट्टी या पूजेत सहभागी होऊन त्यांनी छिंदमच्या प्रवृत्तीला बळ दिले आहे. त्यांच्यावरही कारवाई व्हावी.
– अशोक मांडगे, शिवप्रेमी


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)