छात्रसेना आणि रासेयोच्या विद्यार्थ्यांचे शिवनेरीवर गिर्यारोहण

शिवनेरी- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर (ता. जुन्नर) च्या राष्ट्रीय छात्रसेनेचे कॅंडेट आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना गिर्यारोहणाचा अनुभव प्रात्यक्षिकाने मिळावा म्हणून प्राचार्य डॉ. टी. एन. साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले शिवनेरी येथे महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख डॉ. उमेश पनेरू यांच्या नेतृत्वाखाली गिर्यारोहण प्रात्यक्षिक कार्यशाळा घेतले.
या कार्यशाळेस मार्गदर्शक व्याख्याते म्हणून शिवाजी ट्रेलचे विश्वस्त विनायक खोत, उपाध्यक्ष रमेश खरमाळे, शिवाजी ट्रेल इतिहास कल्बचे विजय कोल्हे उपस्थित होते. या प्रात्यक्षिक कार्यशाळेस डॉ. सुधीर गायकवाड, प्रा. अनिल लोंढे, डॉ. सुनील लंगडे प्रा.अमोल बिबे, डॉ. भूषण वायकर, डॉ. आर. एन. कसपटे उपस्थित होते.
येथील मार्गदर्शन कार्यशाळेचे अध्यक्षस्थान योगायोगाने येथे आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी सकवारबाई यांच्या माहेरच्या गायकवाड घराण्याचे वंशज संतोष गायकवाड यांनी भूषविले.
प्रात्यक्षिकाआधी विनायक खोत यांनी गिर्यारोहणाचे तंत्र विद्यार्थ्यांना सांगून त्याचे शरीराला होणारे फायदे, गड-किल्ल्यांचे संवर्धन, ट्रेकिंग करताना घ्यावयाची काळजी, आवश्‍यक साहित्य या विषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. सुनील लंगडे यांनी केले. प्रा. अमोल बिबे यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. अनिल लोंढे यांनी आभार मानले.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)