छातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग २)

डॉ. राजेश पाटील
छातीत दुखतं ही कल्पनाही घाबरून सोडते. छातीचं दुखणं म्हणजे “हार्ट अटॅक’ असं जणू समीकरणच बनत आहे. मग सुरू होतो विविध तपासण्यांचा भडीमार. अँजिओग्राफि, अँजिओप्लॅस्टी, आणि वेळ आली तर बायपास सर्जरीही. या उपचार पद्धतींबरोबर त्यांचे वाढते अवाढव्य खर्च या विचाराने रुग्ण नि त्याच्या संबंधित व्यक्तींचं आयुष्य विस्कळीत होतं. 
हृदयाच्या झटक्‍याची लक्षणं कोणती? 
हृदयरोगाची लक्षणं झटका येण्याच्या अगोदरच दिसून येतात; परंतु लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण हृदरोगी मात्र याकडे दुर्लक्ष करतात. एखाद्याला हृदयाचा झटका आला आहे, हे ओळखणं फार कठीण असतं. त्यावेळी श्‍वास घ्यायला त्रास होतो. भरपूर घाम येतो. मळमळतं. चक्कर येते. उलट्या होतात. शरीराला कंप सुटतो. ही हृदयाच्या झटक्‍याची सामान्य लक्षणं आहेत. कधीकधी छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात. या वेदना छाती किंवा पोटाच्या मध्यभागी वा पाठीच्या मणक्‍यात होतात. तिथून त्या मानेत किंवा डाव्या हाताकडे जाऊ शकतात. या वेदना 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकतात. काही वेळा रुग्णाच्या शरीराचा रंग बदलतो. अचानक रक्तदाब कमी होऊन मृत्यूही येतो.
या आजारावर काही प्रथमोपचार आहेत का? 
हो. आहेत ना, पण हे उपचार रुग्णावर झटकन झाले पाहिजेत आणि ते झाले तर रुग्णाचे जीव वाचतात. जोपर्यंत वैद्यकीय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवं झोपवावं. त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावेत. जर ऑक्‍सिजन सिलिंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरित ऑक्‍सिजन द्यावा. नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरब्रिटेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरित त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी. पाण्यात ऍस्प्रीन ढवळून द्यावं.
डॉक्‍टरांकडून केले जाणारे उपचार कोणते? 
हृदयविकारावर झटकन वैद्यकीय उपचार आणि इस्पितळात भरती करणं गरजेचं असतं. हृदयाचा त्रास निर्माण झाल्याची काही मिनिटं, काही तास जरा संकटाचे असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधं दिली जातात. डॉक्‍टर रुग्णांची सूक्ष्म तपासणी करतात. हृदयाची स्पंदनं मोजतात. रक्तदाब पाहतात. इलेक्‍ट्रोकार्डिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो. ईसीजीमुळे हृदयाच्या ठोक्‍यांचा अंदाज येतो. या ठोक्‍यांमध्ये काही असामान्य लय आहे का ते दिसते. हृदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचं नुकसान झालेलं असल्यास तेही लक्षात येतं. मात्र, प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. हृदयाच्या मांसपेशींचं नुकसान झालेलं असल्यास ते रक्ताच्या परीक्षणात दिसून येतं. छातीचा एक्‍सरेदेखील घेतला जातो. हृदयाच्या माहितीसाठी इकोकार्डिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कॅन चाचणी आहे. हृदयाच्या कार्याची माहिती मिळते. कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी अँजिओग्राम काढला जातो.
तपासण्यात हृदयाची स्पंदनं असामान्य आढळली तर त्यावर उपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधं दिली जातात. रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधं दिली जातात. प्रत्येक रुग्णाची आणि त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचं नुकसान आणि अडथळ्यांचं प्रमाण, रुग्णाचं वय लक्षात घेऊन उपचारपद्धती ठरवली जाते. कित्येक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्‍चित प्रक्रिया आवश्‍यक असते. रक्त पातळ करण्याची इंजेक्‍शनही दिली जातात. कोरोनरी अँजियोप्लास्टी, फुग्याने रक्त वाहिन्यांचा अडथळा दूर करणं किंवा कोरोनरी बायपास सर्जरीचा उपयोग केला जातो.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)