छातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग १)

डॉ. राजेश पाटील 
छातीत दुखतं ही कल्पनाही घाबरून सोडते. छातीचं दुखणं म्हणजे “हार्ट अटॅक’ असं जणू समीकरणच बनत आहे. मग सुरू होतो विविध तपासण्यांचा भडीमार. अँजिओग्राफि, अँजिओप्लॅस्टी, आणि वेळ आली तर बायपास सर्जरीही. या उपचार पद्धतींबरोबर त्यांचे वाढते अवाढव्य खर्च या विचाराने रुग्ण नि त्याच्या संबंधित व्यक्तींचं आयुष्य विस्कळीत होतं. 
भारत 2020 पर्यंत सर्वाधिक हृदयरुग्ण असलेला देश होईल, असं भाकीत जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवलं आहे. त्यात 25 ते 30 वर्षे वय असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. 2002 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा हृदयविकाराशी संबंधित अहवाल जाहीर झाला. त्या अहवावालात असं म्हटलं होतं की, जगातील 12.5 टक्के मृत्यू हे हृदयाच्या कार्यात बिघाड झाल्याने होतात. अमेरिकेतील पाचांतील एक मृत्यू हा हृदयघाताने होत आहे. भारतात 2007 साली 32 टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळे झाले होते. तर सन 2018 मध्ये त्याचे प्रमाण 45 टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त आहे.
एकंदरीत हृदयरोगामुळे मृत्यूचं प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत असल्याचं सातत्याने होणाऱ्या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. दरवर्षी जगातील पावणेदोन कोटी नागरिक हृदयाच्या आजाराने दगावतात. एड्‌स, टीबी, मलेरिया, मधुमेह, सर्व प्रकारचे कर्करोग आणि श्‍वासरोगामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षा हृदयरोगाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या कैकपटीने जास्त आहे. काही दशकांपूर्वी तरुणाला आलेला हृदयविकाराचा झटका आश्‍चर्य व्यक्त करायला लावणारा होता. मात्र, आता चित्र बदललं आहे. देशातील एकूण हृदयरुग्णांपैकी 33 टक्के रुग्ण हे 45 पेक्षा कमी वयाचे आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. यात तरुणांची संख्याही वाढत आहे.
काय आहेत कारणं? 
सामान्य जीवनासाठी धोकादायक ठरत असलेल्या हृदयविकारची कारणं अनेक आहेत. विद्यार्थ्यांमधील पहिलं कारण आहे, तरुण पिढीवर चारही बाजूने येणारं दडपण. त्यात भर पडते लहानपणापासूनच असणारं पुस्तकांचं ओझं, महाविद्यालयातील प्रवेश, परीक्षेचा ताण यांची. त्यानंतर करिअरविषयी वाढणाऱ्या चिंता, ध्येयपूर्तीसाठीचा दबाव, पुढे जाण्याच्या स्पर्धेत मागे पडण्याची चिंता. हृदयविकाराचे झटके येण्याच्या अनेक घटनांत हीच महत्त्वाची कारणं आढळून आली आहेत. धमन्यांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळेही हृदयविकार वाढतो. मात्र, ही बाब अचानक होत नाही. तर धमन्यांमध्ये अडथळ्याची प्रक्रिया लहानपणापासूनच सुरू होते. वाढत्या वयाबरोबर ही प्रक्रिया अधिक वाढू लागते. आनुवंशिकतेमुळेही भारतीयांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढत आहे. कारण भारतीयांमध्ये लो डेफिनेशन लिपोप्रोटीन (एलडीएल) किंवा वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतं. तरीही संतुलित जेवण, योग्य जीवनशैलीचं पालन यांनी एलडीएलच्या प्रमाणाला नियंत्रित करता येऊ शकतं.
हृदयाशी संबंधित आजार कोणते? 
प्रमुख आजार आहे हृदयविकार. या संज्ञेत हृदयाच्या अनेक प्रकारच्या दुखण्यांचा समावेश होतो.
ऍनजायना पेक्‍टोरिस (अपक्षळपर झशलीीेंळी) हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यामुळे छातीत, पाठीत, मानेत, हातात किंवा यापैकी एखाद्या ठिकाणी वेदना होणं आर्टिरिओ स्क्‍लेरॉसिस (अीींशीळे डलश्रशीीेळी) – शुध्द रक्तवाहिन्यांची/धमन्यांची लवचिकता कमी जाऊन त्या कडक होत जाणं कार्डिऍक अरेस्ट (उरीवळरल रीीशीीं)- हृदयक्रिया बंद पडणं, कॉरोनरी हार्ट डिसाज्‌ (उीेपररू हशरीीं वळीशरीश- हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा येणं किंव्या त्या चिंचोळ्या होणं), व्हॉल्व्यूलर हार्ट डिसीज्‌ (तरर्श्रीींश्ररी हशरीीं वळीशरीश) हृदयातील झडपेचा आजार
ही दुखणी हृदयविकार किंवा हृद्रोगात (कशरीीं वळीशरीश) येतात.
हृदय बंद पडतं किंवा त्याच्या कार्यात बिघाड होतो म्हणजे काय होतं? 
हृदयाचे स्नायू खराब होणं, बिघडणं. म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बंद होतात. त्यामुळे हृदयाकडे होणारी रक्ताभिसरणाची क्रिया थांबते. हृदयाचा रक्तपुरवठा खंडित होतो. त्यामुळे हृदयक्रिया बंद पडते. जर हे रक्ताभिसरण सहा तासांपेक्षा जास्त वेळ बंद असेल तर हृदयाच्या भागात असणारे स्नायू मरतात. किंवा कायमचे खराब होतात. याला हृदयक्रिया बंद पडणं (हार्ट अटॅक) असं म्हणतात. हृदयाच्या स्नायूंमध्ये असणारी रक्ताची गुठळी होणं किंवा रक्तातील गुठळीमुळे हृदयाच्या रक्तवाहिनीचे तोंड बंद होणं असंही म्हणतात. रक्तवाहिनीचं तोंड बंद झाल्याचा परिणाम हृदयाच्या थोड्या भागांवर झाला असेल छोट्या प्रमाणातील हार्ट अटॅक येतो आणि जास्त भागावर परिणाम झाला असेल तर त्याला मोठ्या प्रमाणातील हार्ट अटॅक किंवा हृदयाचा तीव्र झटका असं म्हणतात.
What is your reaction?
0 :thumbsup:
3 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)