छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

पिंपरी – रुग्णालयासाठी माहेराहून दहा लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड येथे राहणाऱ्या 28 वर्षीय विवाहितेने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, चंद्रदीप संतोष पाटील (वय-30), सासू ऊर्मिला पाटील (वय-61), सासरे संतोष पाटील (वय-64, सर्व रा. विद्यानगर कॉलनी, स्टेशन रोड, ता. रावेर, जि. जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 डिसेंबर 2014 ते 28 फेब्रुवारी 2018 या कालावधीत आरोपींनी आप-आपसात संगनमत करून पीडित विवाहितेला माहेराहून दहा लाख रुपये आणावेत, यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच त्यांचे 36 तोळे वजनाचे सोन्याचे दागिनेही काढून घेतले. सहायक निरीक्षक नीलेश वाघमारे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)