छळामुळे गर्भपात ; पतीविरुध्द गुन्हा

पिंपरी – माहेरुन पैसे आणण्यासाठी पतीने केलेल्या मानसिक व शारिरीक छळामुळे पत्नीचा गर्भपात झाल्याची घटना रहाटणी येथे घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 28) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संदीप अरूण पवार (नखाते नगर, रहाटणी) याच्याविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात पतीविरोधात महिलेचा छळ व गर्भपाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप याने पीडितेची फसवणूक करुन तिच्याशी लग्न केले. यावेळी माहेरुन पैसे आण म्हणून तो तिला मारहाण करत असे व ती गर्भवती आहे असे कळताच त्याने जेवणातून गोळ्या देऊन तिचा गर्भपात केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पतीला अद्याप अटक झालेली नसून वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)