छळवणूक प्रकरणी सीपीएम आमदाराची 6 महिन्यांसाठी पक्षातून हकालपट्टी 

तिरुअनंतपूरम (केरळ) – एका महिला सदस्याच्या छळवणूक प्रकरणी सीपीएम पक्षाचे आमदार पीके शशी यांचे पक्ष सदस्यत्व सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात आले आहे. सोमवारी पक्षाच्या सेक्रेटरीएटमध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी पक्षाच्या एका समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी केली होती . या चौकशीत आमदार पीके शशी दोषी असल्याचे आढळून आले.

एका युवा महिला सदस्याने पीके शशी यांच्या विरोधात तक्रार केली होती. पीके शशी यांच्याविरुद्ध पोलीसात जाण्याऐवजी तिने पक्षाकडेच न्याय मागितला होता. काही फोन कॉल्सवरून पीके शशी त्या महिला सदस्याशी असभ्य भाषा बोलल्याचे दिसून आले. शशी यांच्या विरुद्ध पक्षाने केलेल्या कारवाईने केवळ केरळमधीलच नाही, तर देशभरातील नेत्यांना धडा मिळेल, असे डाव्या पक्षाच्या खासदार पीके श्रीमती यांनी सांगितले.

-Ads-

या बाबतीत पोलीस कारवाई करणार का? या प्रश्‍नाला उत्तर देताना पीके श्रीमती यांनी सांगितले, की त्याची आवश्‍यकता नाही. तक्रार करणाऱ्या महिलेचा पक्षावर पूर्ण विश्‍वास आहे. त्यामुळे हे प्रकरण पोलीसात जाणार नाही. मात्र विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांनी हे प्रकरण पोलीसांपर्यंत नेण्याची मागणी केली. पक्ष नाही, तर पोलीस आणि न्यायालयाने याचा निर्णय लावला पाहिजे, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)