छळप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

पिंपरी – फ्लॅट स्वतःच्या नावावर करून देण्याची मागणी करत पतीने पत्नीला मारहाण केली. तसेच पत्नीच्या नावावर असलेल्या फ्लॅटचे भाडे तिने पतीकडे जमा करावे, यासाठी पत्नीचा छळ करणाऱ्या पतीवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती अभिजित नीलकंठ जेधे (रा. मेगा पॉलीस सोसायटी, हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हिंजवडी येथे नोकरी करते. तिच्या नावावर हिंजवडी येथे फ्लॅट आहे. त्यामध्ये फिर्यादी महिला आणि तिचा आरोपी पती राहत आहेत. मागील काही दिवसांपासून आरोपी पती अभिजित याने पत्नीच्या नावावरील फ्लॅट स्वतःच्या नावावर करून देण्याची मागणी केली. तसेच पत्नीने तिच्याच घरात राहण्यासाठी पतीकडे घरभाडे जमा करावे, अशी देखील मागणी केली. त्यासाठी अभिजित याने तिला वेळोवेळी पट्ट्याने आणि लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. सोमवारी (दि. 19) रात्री साडेनऊच्या दरम्यान अभिजित याने पत्नीच्या डोळ्यावर जोरात मारले, तसेच त्यांचे केस धरून डोके भिंतीवर आदळले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)