छळप्रकरणी तिघांवर गुन्हा

पिंपरी – व्यवसाय करण्यासाठी माहेराहून पैसे आणले नाही म्हणून विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना वाकड परिसरात घडली.

पती बाळकृष्ण रमेश वाघमारे, सासू व मयत सासरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बाळकृष्ण यांच्या पत्नीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा 2017 मध्ये विवाह झाला. लग्नानंतर सहा महिन्यांनी व्यवसाय करण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणले नसल्याच्या कारणावरून आरोपींनी आपसात संगनमत करून छळ करण्यास सुरवात केली. तसेच कौटुंबिक कारणावरून शिवीगाळही केली.

शिळे अन्न खाण्यास देणे, उपाशी ठेवणे असा त्रास दिला. तू वांजुटी आहेस, असे म्हणून घालून पाडून बोलण्यास सुरवात केली. तसेच अंगावर रॉकेल ओतून जाळून टाकण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)