‘छम्मा छम्मा’ गाणे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘ही’ अभिनेत्री घेणार उर्मिलाची जागा 

बॉलिवूडमधील जुनी गाजलेली गाणी पुन्हा एकदा नवीन अंदाजात सादर करण्याचा ट्रेंड सध्या जोर धरत आहेत. यामध्ये आता उर्मिला मातोंडकरचे ‘छम्मा छम्मा’ हे गाणेही सामील झाले आहे. या नव्या स्वरूपातील गाण्यावर एली अवराम थिरकरणार आहे.

एलीने आज ट्विट करत लिहले कि, ‘लवकरच ‘छम्मा छम्मा’चे रिएक्रिएशन होणार आहे. परंतु, त्याआधी सदाबहार गाण्याच्या रिमेकचा हिस्सा बनल्याने मी आभारी आहे.’ मनीष भट्ट दिग्दर्शित ‘फ्रॉड सैंया’ या चित्रपटात ‘छम्मा छम्मा’ या गाण्याचे रिमेक होणार आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन आदिल शेख यांनी केले आहे तर नेहा कक्कड़ने या गाण्याला आवाज दिला आहे.

दरम्यान, राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘चायना गेट’ चित्रपटात नसीरुद्दीन शाह, डॅनी डेंजोंगप्पा, परेश रावल, ओम पुरी आणि अमरीश पुरी मुख्य भूमिकेत होते. यामधील ‘छम्मा छम्मा’ हे गाणे उर्मिला मातोंडकरवर चित्रित करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)