छबीणा सोहळ्यासाठी मढीत पालख्या दाखल

भाविकांना पाणीटंचाईला द्यावे लागणार तोंड
पाथर्डी – श्री क्षेत्र मढी येथे तिसऱ्या श्रावणी शुक्रवार निमित्त उद्या चैतन्य कानिफनाथांच्या पालखी (छबीणा) सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन पालख्या वाजत गाजत मढी येथे दाखल झाल्या आहे. पावसाने हुलकावणी दिल्यामुळे भाविकांची तहान भागवितांना देवस्थान समितीची कसोटी लागणार आहे.
दरवर्षी प्रत्येक श्रावण महिन्यातील शुक्रवारी कानिफनाथ गडावरून पालखी काढली जाते. तिसऱ्या शुक्रवारी नाथांच्या सोहळ्यासाठी पुणे, कल्याण, नाशिक, इगतपुरी, बारामती, लोणावळा, भांगरवाडी, मुळशी, नगर, बीड येथुन पायी चालत नाथांच्या दिंड्या, पालख्या मढी येथे कानिफनाथांच्या उत्सवासाठी येतात. त्यामुळे मढीला यात्रेचे स्वरूप येते. अनेक पालख्या दोन दिवस अगोदर दाखल झाल्या आहेत. परिसर, कानिफनाथांचा नामाचा जागर नवनाथ पारायण, नाथांचे भजन वाद्यवृदांसह आरती आदी कार्यक्रमांनी मढी येथील मंगलमय वातावरण तयार झाले आहे. विविध प्रकारे नाथांची समाधी पुजा करत फटक्‍यांची आताषबाजी करतात. रात्रभर असा सोहळा रंगतो. दुष्काळी परिस्थित मढीत भाविकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे.
देवस्थान समितीकडुन पालखी सोहळ्याची तयारी पुर्ण झाल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली. कानिफनाथांच्या मुख्य मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवस्थान समितीतर्फ निवास व महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. पावसाने ओढ दिल्याने पालखी सोहळ्यावर पाणी टंचाईचे सावट असुन मढी येथे पाणीसाठे पूर्ण कोरडे पडले आहेत. सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. हनुमान टाकळी शिवारातुन टॅंकर विकत आणावे लागतात.
पालखी सोहळ्यानिमित्ताने ग्रामपंचायत मढी यांच्या वतीने पालखी मार्ग स्वच्छता करण्यात आली असुन विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्‍यातील श्रावणातील सर्वात मोठी यात्रा मढीच्या पालखी सोहळ्याकडे बघीतले जाते. भाविकांची गर्दी व वाद टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी देवस्थान समितीने केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)