छत्रपती संभाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम

कोरेगाव भीमा-येथील छ. संभाजी हायस्कूलमधील स्काउंट गाईडच्या विद्यार्थ्यांनी रस्ते, चौकात स्वच्छता मोहीम राबविली. 10 दिवसाच्या गणेशोत्सवात अनेक गणेशमूर्तींचे विसर्जन भीमा नदीच्या पात्रात केले होते. विसर्जनावेळी विविध प्रकारचे फुलांचे हार, केळीची खुटे, फळे, नारळ तसेच आदी साहित्य थेट नदीच्या पात्रात टाकले होते. स्काऊट गाईडच्या मुलांनी कोरेगाव भीमा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या साथीने नदी पात्रातातील निर्माल्य एका ठिकाणी जमा करत पात्र स्वछ केले.
या पक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक विजयसिह पाटील, स्काऊट गाईडचे प्रशिक्षक अनिल साकोरे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागीय सदस्य नारायण फडतरे, सरपंच संगिता कांबळे उपसरपंच शारदा गव्हाणे, माजी उपसरपंच जितेंद्र गव्हाणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)