छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

चिंचवड – छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती देवा ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानातील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

पुष्पहार अर्पण करुन अभिषेक आणि महापूजा करण्यात आली. देवा कुलकर्णी, नितीन सुरवसे, लखन सावंत, प्रसाद डांगे, गणेश गुंड, अण्णा गुंड, कुश कोकाटे, प्रकाश गवळी, हर्षद शेख, राहुल जैन, सुनील लटके, अनिल घोलप, समाधान गवळी, धीरज कापसे, विठ्ठल डिसले, विशाल निंबाळकर, सोन्या जगताप आदींनी संयोजन केले.

नवी सांगवीतील शिवरत्न शंभूराजे वेल्फेअर ट्रस्ट तर्फे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक हलगी वादनाच्या गजरात दिमाखदार पालखी सोहळा काढण्यात आला. तसेच पालखी मार्गावर संचलन करून वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही, याची काळजी घेत शिस्तबद्ध सोहळा पार पाडण्यात आला.

हलगी वादन, मशाल, फेटा बांधून पालखी संचलन करणारे तरुण,भगवे ध्वज यांनी वातावरणाला मराठमोळा रंग प्राप्त झाला होता. सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या हस्ते संभाजी महाराजांची आरती करण्यात आली व शिववंदना घेण्यात आली. यावेळी उपस्थितांना झाडाची रोपे देऊन नवीन पायंडा पाडण्यात आला व झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)