छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी

वाई ः किसनवीर महाविद्यालयात मार्गदर्शन करताना प्रताप गंगावणे. व्यासपिठावर उपस्थित मान्यवर.

प्रतापराव गंगावणे : संस्कार जपणारी पिढी निर्माण करणे काळाची गरज
वाई, दि. 18 (प्रतिनिधी) – आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला 350 वर्षांचा कालावधी उलटला असूनही छ. संभाजी महाराजांचा इतिहास हा लिहीणारांनी चुकीच्या पद्धतीने मांडला असला तरीही आजच्या तरुणांना छ. शिवाजी महाराजांची राज्यकारभार व्यवस्था, छ.संभाजी महाराजांची धर्मनिष्ठा, पराक्रम, या इतिहासातील खास वैशिष्ट्यांचे प्रबोधन आजच्या तरुणांना झाल्यास संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यास मदत मिळेल व भावी पिढी घडविण्यासाठी तो प्रेरणादायी आहे, छत्रपतींचे संस्कार जपणारी पिढी निर्माण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक, व सध्या गाजलेल्या टीव्ही मालिकेतील स्वराज्यरक्षक छ. संभाजी महाराज मालिकेचे पटकथा लेखक प्रतापराव गंगावणे यांनी किसनवीर महाविद्यालयात कनिष्ठ विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
प्रतापराव गंगावणे हे धर्मवीर छ. संभाजी महाराज या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले होते. यावेळी प्रा. विलास खंडाईत कनिष्ठ विभागचे उपप्राचार्य प्रा. देवानंद शिंगटे, पर्यवेक्षक प्रा. नारायण घाडगे, प्रा. बाळासाहेब कोकरे, प्रा. मल्लिकार्जुन खटावकर, प्रा. भीमराव यादव, प्रा. संतोष दोरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रतापराव गंगावणे म्हणाले, छ. संभाजी महाराजांचा इतिहास शिक्षणाच्या अभ्यासक्रमात चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला असल्याची खंत व्यक्त करीत गंगावणे म्हाणाले, व्यसनी व दुराचारी व्यक्ती एवढा मोठा राज्यकारभार कशी सांभाळू शकते, वयाच्या बाविसाव्या वर्षी स्वराज्याची धुरा सांभाळून धर्मवीर छ. संभाजी महाराजांनी लढलेल्या सलग तीनशे लढाया, समाज व्यवस्था, अन्यायाविरुध्द उठविलेला आवाज, हा औरंगजेबाची झोप उडवून देणारा होता. महाकपटी परंतु युद्ध नीतीत प्रचंड हुशार असणाऱ्या औरंगजेबाला सळो कि पळो करून जेरीस आणणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराजांनाच आपल्याच इतिहासकारांनी चुकीच्या पद्धतीने समाजासमोर मांडण्यात धन्यता मानली. छ. संभाजी महाराज यांच्या युध्द नीतीचा व प्रेरणादायी राज्यकारभाराचा अभ्यास जगातील पुढारलेली राष्ट्र करीत आहेत. आजच्या तरुण पिढीला धर्मवीर छ. संभाजी महाराज खऱ्या अर्थाने समजण्यासाठी, त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मुगलांच्या काळात रयतेचा होणारा छळ, होणारी पिळवणूक, अत्याचार, अन्याय, देव देवतांची होणारी विटंबना, थांबविण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना छ. शिवाजी महाराजांनी केली. छ. संभाजी महाराजांनी तो उभा केलेला स्वराज्याचा डोलारा अतिशय खंबीरपणे सांभाळत जीवाची बाजी लावून राष्ट्रभक्ती, धर्मवेड काय असते ते दाखवून दिले. तरी स्वराज्य रक्षक छ. संभाजी महाराज मालिकेतून खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे, तो पूर्णपणे यशस्वी झाला आहे. या वेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विलास खंडाईत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गणेश चव्हाण यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.बाळासाहेब कोकरे यांनी करून तर प्रा. संतोष दोरके यांनी आभार मानले. यावेळी कनिष्ठ विभागचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)