छत्रपती शिवाजीराजे-संभाजीराजे पायी पालखीचे स्वागत

मंचर- किल्ले शिवनेरी ते किल्ले पुरंदर छत्रपती शिवाजीराजे-छत्रपती संभाजीराजे भेट पायी पालखी सोहळ्याचे मंचर येथे पारंपारिक वाद्यात स्वागत करण्यात आले. यावेळी विविध संघटनांचे मान्यवर उपस्थित होते.
शिवचरित्र व शंभुचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांच्या नेतृत्वाखाली स्वराज संघाच्या वतीने पायी पालखी सोहळ्याचे मंचर येथे सरपंच दत्ता गांजाळे यांच्या नेतृत्वाखाली स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य बाजीराव मोरडे, अरुण बाणखेले, कैलास बाणखेले, स्वप्नील बेंडे, महेश थोरात, शिवसेनेचे युवा संघटक कल्पेश बाणखेले, भाजपचे सुशांत थोरात, गणेश बाणखेले, रमेश शेवाळे, दिलीप पवळे, बाबाजी चासकर, रंगनाथ थोरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
पारंपारिक वाद्यात मंचर शहरात पालखीचे आगमन झाल्यानंतर विविध ठिकाणी नागरिकांनी स्वागत केले. यावेळी अरुण गिरे, सुरेश भोर, राजाराम बाणखेले, अभय भोर यांनी छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प. संतोष महाराज बढेकर यांनी केले. सूत्रसंचालन अनिल चव्हाण यांनी केले तर वैभव पोखरकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)