“छत्रपती शिवराय क्रीडा गौरव’ पुरस्कार प्रदान

पिंपळे गुरव – कॉंग्रेस दापोडी विभाग व अद्वैत क्रीडा केंद्राच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त पिंपळे गुरव येथे “छत्रपती शिवराय क्रीडा गौरव’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी विशेष पुरस्कार ममता अंध अनाथ आश्रमातील राष्ट्रीय खेळाडू हनुमंत कुदळे यांना सामाजिक कार्यकर्ते मदन कोठुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदानंद साबळे, देवेंद्रसिंग यादव, बलभीम भोसले, आशिष उबाळे, सार्थक बाराथे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी अंध खेळाडू हनुमंत कुदळे आपल्या मनोगतात म्हणाले की, आज महिलांवरील अत्याचारामुळे मुली व महिला असुरक्षित आहेत. आज महाराज असते तर, हे पाहून दुःखी झाले असते. त्यासाठी प्रत्येकाने शिवाजी महाराज बनून अत्याचारा विरूद्ध लढले पाहिजे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने अंधांसाठी महापौर चषक स्पर्धा आयोजित केली पाहिजे तरच आम्हाला सुध्दा देशाचे खेळात प्रतिनिधित्व करावयास संधी मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी तानाजी काटे, वसंत काटे, तुषार कांबळे, राजाभाऊ वाळुंजकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रथमेश बाईत यांनी केले. आभार दत्तात्रय भोसले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)