छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मोहन भागवत येणार

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या 338 व्या पुण्यतिथीदिनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम किल्ले रायगड येथे 30 व 31 मार्च रोजी होणार आहे. यावर्षी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित राहणार आहे.

तसेच अध्यक्ष म्हणून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित असणार आहेत, अशी माहिती श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मंडळाचे सहकार्यवाहक पांडुरंग बलकवडे आणि कार्यवाह सुधीर थोरात उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)