छत्रपती शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे- राजेश क्षीरसागर

कोल्हापूर –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभा सभागृहामध्ये कोल्हापूर विमानतळाचे “छत्रपती राजाराम महाराज विमानतळ कोल्हापूर” असे पुनर्नामकरण करणेचा म.वि.स नियम ११० अन्वये शासकीय ठराव मांडला. यावर आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री महोदयांचे संपुर्ण करवीर नगरीच्या तसेच कोल्हापूरच्या नागरिकांच्या वतीने आभिनंदन केले.

मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय  अधिवेशनामध्ये शासनाच्या वतीने कोल्हापूर विमानतळाचे “छत्रपती राजाराम महाराज विमानतळ कोल्हापूर” असे पुनर्नामकरण करण्याचा ठराव ठेवण्यात आला. या ठरवाबद्दल समस्त करवीरवासीयांच्यावतीने आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे आभिनंदन केले. याप्रसंगी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल असून कोल्हापूरसाठी ही अभिमानाची बाब आहे, राजर्षी शाहू महाराजांचे कर्तृत्व मोठे होते. मात्र, त्यांचे अपुरे काम पूर्ण करण्याचे कार्य छत्रपती राजाराम महाराजांनी केले.

राजर्षी शाहू महाराजांचे विचार व वारसा त्यांनी पुढे चालविला. कोल्हापूर संस्थानमध्ये दळण-वळण व वाहतुकीच्या दृष्टीने व्यापार वाढीसाठी विमानतळ असावे, या हेतूने उत्तुंग व उल्लेखनीय असे प्रयत्न छत्रपती राजाराम महाराजांनी केले. 1930 ते 35 या कालावधीत विमानतळाचे काम सुरू केले. विमानतळाचे सन 1940 ला छत्रपती राजाराम महाराजांच्याच हस्ते झाले आणि तेथून पुढे कोल्हापूर खर्‍या अर्थाने जगाच्या पटलावर गेले. जिल्ह्यातील उद्योग व शेती क्षेत्राला विकासाची झेप घेण्यासाठी प्रयत्न छत्रपती राजाराम महाराजांनी केले. त्या कार्यकर्तृत्वाची दखल शासनाने घेतली असून त्यांचा योग्य सन्मान केला आहे.

त्याच बरोबर भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. सेवा, कला, साहित्य, विज् ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा अमूल्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असून, बहुजनांचे कैवारी, महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करणे बाबत राज्य शासनाने प्रयत्न करावा, अशी मागणी या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)