“छत्रपती’ शाळेच्या मुख्याध्यापकांना मणिरत्न पुरस्कार

भवानीनगर- पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट, उरळीकांचन यांच्याकडून 2018चा मणिरत्न शिक्षक गौरव पुरस्कार व सन्मान चिन्ह देउन श्री छत्रपती हायस्कूल, काटेवाडीचे (ता.बारामती) मुख्याध्यापक अनिल मधुकर खैरे व सणसरचे (ता. इंदापूर) मुख्याधापक सुनिल दत्तात्रय सर्जे यांचा शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव करण्यात आला. गेल्याच महिन्यात सणसर हायस्कूलला उपक्रमशील शाळा म्हणून शिरूर-हवेली शिक्षक संघाने गौरविले होते. काटेवाडी व सणसर येथील दोन्ही शाळा छत्रपती शिक्षण संस्था भवानीनगर (ता.इंदापूर) संचलित आहेत. सणसरला उपक्रमशील शाळा पुरस्कार पाठोपाठ मुख्याध्यापकांचा गौरव झाल्याने संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्याची प्रतिक्रिया परीसरातून व्यक्त करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)