छत्तीसगढ, तेलंगणात नक्षलवाद्यांचा धुमाकूळ

संग्रहित छायाचित्र.

रायपूर: छत्तीसगढमधील सुकमा जिल्हय़ामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीमध्ये दोन नक्षलींना पोलिसांनी ठार मारले आहे. यामध्ये एक महिलेचाही समावेश आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात दारुगोळाही जप्त केला आहे. दरम्यान, तेलंगणामध्ये नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचे थैमान घालत एकाची हत्या केली आहे.
सुकमा जिल्हय़ात चिंतलनार पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात मोरपल्ली येथे ही चकमक उडाली.

छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमारेषेवर असणाऱया जंगल क्षेत्रात टेटेमदगु परिसरात नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी त्याला चोख प्रत्युत्तर देत दोन नक्षलींना मारले. घटनास्थळावरून दोन मृतदेह आणि मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

तर तेलंगणाच्या भद्रारी कोथागुदेम जिल्हय़ामध्ये नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून आणला. पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून त्यांनी एकाची हत्या केली. वीरापुरम येथे झालेल्या या गोळीबारामध्ये पी. जोगैया याची हत्या केली. ही व्यक्तीही आधी नक्षलवादी होता. या नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील तीन वेगवेगळय़ा घटनांमध्ये अनेक वाहनांना आगी लावत मोठे नुकसान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)