छत्तीसगढ, तेलंगणात चकमकीमध्ये दोन नक्षलवादी ठार

प्रातिनिधिक छायाचित्र

रायपूर – छत्तीसगढमधील सुकमा जिल्हयामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीमध्ये दोन नक्षलींना पोलिसांनी ठार मारले आहे. यामध्ये एक महिलेचाही समावेश आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठया प्रमाणात दारुगोळाही जप्त केला आहे. सुकमा जिल्हयात चिंतलनार पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात मोरपल्ली येथे शनिवारी सकाळी ही चकमक झाली. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमारेषेवर असणाऱ्या जंगल क्षेत्रात टेटेमदगु परिसरात नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी त्याला चोख प्रत्युत्तर देत दोन नक्षलींना मारले. घटनास्थळावरून दोन मृतदेह आणि मोठया प्रमाणात शस्त्रसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

दरम्यान, तेलंगणामध्ये नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचे थैमान घालत एकाची हत्या केली आहे. तेलंगणाच्या भद्रारी कोथागुदेम जिल्हयामध्ये शनिवारी सकाळी नक्षलवाद्यांनी मोठया प्रमाणात हिंसाचार घडवून आणला. पोलिसांचा खबऱया असल्याच्या संशयावरून त्यांनी एकाची हत्या केली. वीरापुरम येथे झालेल्या या गोळीबारामध्ये पी. जोगैया याची हत्या केली. जोगैया देखील आधी नक्षलवादीच होते.

-Ads-

या नक्षलवाद्यांनी छत्तीसगढ व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील तीन वेगवेगळया घटनांमध्ये अनेक वाहनांना आगी लावत मोठे नुकसान केले. दोन ट्रक, एक ट्रक्‍टर, एक जेसीबी आदी वाहनांचे नुकसान केले. तर भद्राचलम जिल्हयात अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एम. रमेश नावाची व्यक्ती जखमी झाली. या सर्व घटनांमध्ये 40 ते 50 नक्षलवाद्यांचे टोळके सहभागी असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र वेळीच त्यांच्यावर नियंत्रण मिळवल्याचेही सांगण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)