छत्तीसगढ : काँग्रेसला झटका; पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षांचा भाजपप्रवेश 

नवी दिल्ली – पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल काही दिवसांपूर्वीच वाजले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेस सर्व शक्ती पणाला लावत आहे. अशामध्येच काँग्रेसला छत्तीसगढमध्ये मोठा झटका बसला आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि पालीताणा खारचे आमदार रामद्याल उईके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री रमन सिंह यांच्या उपस्थिती उईके यांनी भाजपाप्रवेश केला. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा दोन दिवसीय छत्तीसगढ दौऱ्यावर आहेत.

रामद्याल उईके विधानसभेवर चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून गेले आहेत. छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेता अजित जोगी यांनी उईके याना काँग्रेसमध्ये सामील केले होते. भाजपातून काँग्रेसप्रवेश करताना उईके यांनी मरवाहची जागा सोडली होती. आता पुन्हा भाजपप्रवेश केल्याने मरवाहच्या जागेवरून उईके लढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

-Ads-

दरम्यान, छत्तीसगढचे विधानसभा निवडणूक १२ आणि २० नोव्हेंबर रोजी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)