छत्तीसगड सरकार बदलताच अधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र

रायपूर (छत्तीसगड): छत्तीसगडमध्ये सरकार बदलताच अधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. प्रथम मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव अमन सिंह यांनी राजीनामा दिला, त्यानंतर आता गेली नऊ वर्षे अबकारी विभागात करारावर काम करणारे समुद्र सिंह यांनीही राजीनामा दिला आहे. कौटुंबिक कारणांसाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. छत्तीसगड सरकारच्या अबकारी धोरणाचे समुद्र सिंह हे मास्टरमाईंड समजले जातात. अबकारी विभागाने राज्यातील मद्याच्या ठेक्‍यांचे लिलाव बंद करून सरकारी दुकाने चालू केली. या धोरणाचा कॉंग्रेसने जोरदार विरोध केला होता. आपले सरकार येताच दारू विक्री बंद करण्याचे आश्‍वासन कॉंग्रेसने आपल्या घोषणापत्रात दिले होते.

दारूच्या दुकानात कोणत्या ब्रॅंडची दारू विकावी हे देखील समुद्र सिंह यांच्या इशाऱ्यावर ठरत होते. त्यांनी कौटुंबिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. समुद्र सिंह हे माजी अबकारी मंत्री अमर अगरवाल यांचे विश्‍वासू समजले जातात. अमर अगरवाल हे विलासपूर मतदार संघातून पराभूत झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)