छत्तीसगड मध्ये शंभर टक्के मतदान नोंदवण्याचा प्रयत्न 

राज्यात निवडणूक आयोगाचा नवीन प्रयोग 
रायपुर: छत्तीसगडच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राज्यात विशेषता नक्षलग्रस्त अदिवासी भागात शंभर टक्के मतदान नोंदवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. त्यासाठी एक विशेष मोहीम राबवली जात आहे. आपण आगामी निवडणुकीत मतदान करू असे प्रतिज्ञापत्र अदिवासींकडून लिहुन घेतले जात असून बिलासपुर जिल्ह्यातील 2 लाख 10 हजार लोकांनी असे प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे अशी माहितीही राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली आहे.
जशपुर जिल्ह्यातील अदिवासींनाही या विषयी माहिती दिली जात असून त्यांच्याकडूनही मतदान करण्याची ग्वाही घेतली जात आहे. बिलासपुर जिल्ह्यातील 2 लाख 10 हजार लोकांनी मतदानाचा हक्क बजावण्याची लेखी हमी देण्याची घटना हा एक विक्रम असून त्याची नोंद गिनीज बुकात व्हावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. तसे पत्रही गिनीज बुकाकडे पाठवण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. जशपुरच्या अदिवासींमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी जश प्राण नावाची एक योजना राबवली जात असून त्यासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)