छत्तीसगड मध्ये लोकांचे सरकार देऊ 

file photo

राहुूल गांधी यांचे प्रतिपादन 

कोरबा (छत्तीसगड): भारतीय जनता पक्षाच्या पंधरा वर्षांच्या राजवटीमुळे छत्तीसगड राज्याची पुरती विल्हेवाट लागली असून या राज्यात लोकांच्या हितासाठी काम करणारे लोकांचेच सरकार आम्ही देऊ अशी ग्वाही कॉंग्रेस अध्यक्ष राहुूल गांधी यांनी येथील एका प्रचार सभेत बोलताना दिली. ते म्हणाले की नैसर्गिक साधन संपत्तीच्याबाबतीत हे राज्य देशातील सर्वात श्रीमंत राज्य मानले जाते. पण तरीही या राज्यातील जनता मात्र कायम गरीब आणि उपेक्षितच राहीली आहे.

-Ads-

केवळ भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळेच या राज्यातील जनतेवर हे दिवस आले आहेत असे ते म्हणाले. या भागातील गरीब अदिवासींच्या जमीनी सरकारने औद्योगिकरणासाठी हडप केल्या. पण तरीही या भागात उद्योग धंदे उभारले गेले नाहींत. आता या जमीनी मूळ मालकांना परत द्यायला हव्यात त्या दिल्या गेल्या नाहीत. आम्ही या वर्गाला न्याय देऊ, शेतकऱ्यांना सक्षम करू आणि येथील उद्योग धंद्यांना चालना देऊन युवकांना रोजगार पुरवू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी राहुल गांधी यांनी रमणसिंग सरकारवर भ्रष्टाचाराचेही आरोप केले. या सरकारच्या भ्रष्टाचाराबद्दल मोदींनी एक शब्दही उच्चारला नाही असे ते म्हणाले. त्यामुळेच या राज्यातील जनता कायम उपेक्षित आणि दुर्लक्षित राहीली असेही राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केले. छत्तीसगड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधी येथे दाखल झाले आहेत. या टप्प्यात 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)