छत्तीसगड मध्ये नक्षल विरोधी कारवाईत तीन ठार

संग्रहित छायाचित्र.

राजनंदगाव – छत्तीसगडमधील राजनंदगाव जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत नक्षलवाद्यांचा एक डेप्युटी कमांडर आणि त्याचे दोन समर्थक असे एकूण तीन जण ठार झाले. या जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या बोरतलाव भागातील जंगलात ही चकमक झाली.

या जंगलातील टेकडीवरून नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर गोळीबार सुरू केला. त्यावेळी पोलिसांनाहीं त्यांना प्रत्युत्तर देणे भाग पडले त्यात हे, तीन जण ठार झाले. यात ठार झालेल्या नक्षल कमांडरचे नाव आझाद असे आहे. तो नक्षलवादी संघटनेच्या दरेकासा भागाचा डेप्युटी कमांडर होता. अन्य दोन जणांची ओळख पटलेली नाही. पण ते दोघेही या डेप्युटी कमांडरला गरजेच्या वस्तु पुरवण्यासाठीच तिकडे गेले होते असे तपासात निष्पन्न झाले असून ते त्यांचेच समर्थक होते असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेचा आणखी तपशील मिळालेला नाहीं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)