छत्तीसगड मध्ये तीन नक्षलवाद्यांची शरणांगती

संग्रहित छायाचित्र.

रायपुर – ज्यांना पकडण्यासाठी मोठ्या रकमांची बक्षिसे पोलिसांकडून लावण्यात आली होती अशा तीन नक्षलवाद्यांनी आज पोलिसांपुढे शरणांगती पत्करली आहे. कोंदगाव जिल्हा पोलिस प्रमुखांपुढे त्यांनी ही शरणांगती पत्करली आहे. माओवादी तत्वज्ञानातील फोलपणा लक्षात आल्याने त्यांनी हा मार्ग अनुसरला असे पोलिसांनी सांगितले.

शरण आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका महिला नक्षलवाद्याचाही समावेश आहे. राज्य सरकारने नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी जी योजना आखली आहे त्यावरील विश्‍वास दृढ झाल्यानेही आपण शरण येण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी नमूद केले. शरण आलेल्यांमध्ये सुक्कु कोराम नावाच्या इसमाचा समावेश असून तो 30 वर्षांचा आहे आणि त्याच्यावर 3 लाखांचे बक्षिस लावण्यात आले होते. मरदापल पोलिसठाण्यावर मे 2007 मध्ये झालेल्या हल्ल्याचा तो प्रमुख सूत्रधार होता. त्या हल्ल्यात नऊ पोलिस कर्मचारी ठार झाले होते.

शरण आलेल्या दुसऱ्या नक्षलवाद्याचे नाव अंधारी नाग उर्फ अजनाती असे आहे तो 22 वर्षांचा आहे. त्याला पकडून देणाऱ्यांसाठी दहा हजाराचे बक्षिस पोलिसांनी लावले होते. या शरणार्थींना राज्य सरकारच्या पुनर्वसन योजनेनुसार सवलती दिल्या जातील अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)