छत्तीसगड मध्ये कॉंग्रेसला धक्का ‘या’ ज्येष्ठ नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

रायपुर: छत्तीसगड मधील प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष रामदयाल उईके यांनी आज पक्षाला रामराम करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. बिलासपुर येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. उईके हे पाली मतदार संघातून चार वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. दरम्यान त्यांच्या या पक्षांतराला कॉंग्रेसने फार महत्व देण्याचे टाळले आहे.

निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांचा असा दलबदलूपणा सुरूच असतो त्यात नवीन काहीं नाही असे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष भुपेश बाघेल यांनी म्हटले आहे. दरम्यान कालच पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या छत्तीसगड मधील उमेदवार यादीला मान्यता दिली आहे. या यादीची घोषणा येत्या एक दोन दिवसातच केली जाणार आहे. त्या यादीत उईके यांचे नाव होते की नाही याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहे. छत्तीसगड मध्ये येत्या 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)