छत्तीसगड मधील चकमकीत नक्षलवादी ठार 

file photo
रायपुर: छत्तीसगड मधील बिजापुर जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत आज एक नक्षलवादी ठार झाला. ही चकमक शुक्रवारी दुपारी उशिरापर्यंत सुरू होती. जिल्हा रिझर्व्ह गार्ड आणि स्पेशल टास्क फोर्स यांच्या जवानांनी कामकनर गावाजवळील जंगलात नक्षलवाद्यांची शोध मोहीम हाती घेतली त्यावेळी ही चकमक झाली.
चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याच्या जवळ एक .303 ची रायफलही सापडली आहे तथापी त्याची ओळख मात्र अद्याप पटू शकलेली नाही. जगंलात लपलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा फौजांवर प्रतिगोळीबार करून बराच वेळ त्यांच्याशी प्रतिकार केला. पण नंतर मात्र ते जंगलात पळून गेल्याचे वृत्त आहे. या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या विरोधातील आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)