छत्तीसगडमध्ये 90 जागांसाठी 1291 उमेदवार रिंगणात

सोमवारी संपली अर्ज माघारीची प्रक्रिया 

रायपुर: छत्तीसगड राज्यात दोन टप्प्यात होणाऱ्या विधानसभेच्या 90 जागांसाठी एकूण 1291 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 18 नक्षलग्रस्त मतदार संघात 12 नाव्हेंबरला आणि अन्य 72 मतदार संघांमध्ये 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दोन्ही ठिकाणची मतमोजणी 11 डिसेंबर रोजी होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही निवडणूक मुख्यत्वे भाजप विरूद्ध कॉंग्रेस अशीच असली तरी अन्य प्रादेशिक पक्षांच्याही आघाड्या येथील निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. भाजप आणि कॉंग्रेस या दोन मुख्य पक्षांखेरीज मायावती आणि अजित जोगी यांच्यात राजकीय आघाडी झाली असून या आघाडीत कम्युनिस्ट पक्षालाही स्थान देण्यात आले आहे. या सर्व मतदार संघांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत काल संपली त्यानंतर निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे.

नक्षलग्रस्त 18 मतदार संघातील निवडणुकीसाठी एकूण 190 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून उर्वरीत 72 जागांसाठी 1101 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. या निवडणुकीत आम्हीच बहुमत मिळवू असा दावा कॉंग्रेस आणि भाजपने व्यक्त केला असून मायावती- अजित जोगी यांच्या नेतृत्वाखालील आघाडीलाही चांगले यश मिळवण्याचा विश्‍वास आहे. या राज्यात गेली 15 वर्ष भाजप सत्तेत आहे त्यामुळे भाजपची यावेळी कसोटी लागणार आहे. या राज्यातील 19 मतदार संघांमध्ये प्रत्येकी 16 पेक्षा अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असल्याने तेथे दोन मतदार यंत्रे वापरावी लागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)