छत्तीसगडमध्ये 545 खासदारांचे प्रतीकात्मक श्राद्ध आणि पिंडदान 

file photo
जांजगीर-चाम्पा (छत्तीसगड): छत्तीसगडमध्ये 545 खासदारांचे प्रतीकात्मक श्राद्ध घालण्यात येऊन पिंडदान व तर्पण करण्यात आले. सर्व समाज एकता मंच, चाम्पाने रविवारी हसदेव नदीकिनारी डोंगाघाटावर लोकसभच्या सर्व म्हणजे 545 खासदारांच्या श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर कावळ्याला पिंडदान करून श्राद्धभोजन ठेवण्यात आले होते.
एससी-एसटी कायद्याविरोधात खासदारांच्या मृत आत्म्यांना पुन्हा जागृत करण्यासाठी ह्या श्राद्धाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. , असे कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले. एससी-एसटी कायद्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सरकारने अध्यादेश काढून तो निर्णय बदलल्यामुळे संपूर्ण समाजात संतापाची लाट पसरली आहे. आणि त्याचमुळे रविवारी सर्व समाज एकता मंचाने डोंगाघाटावर सर्व खासदारांचे श्राद्ध केले आणि पिंडदान करून श्राद्धाचे भोजनही घातले. रविवारी सकाळी सुरू झालेल्या कार्यक्रमाला लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
एससी-एसटी वर्गाला सर्व समाज एकता मंचाचा मुळीच विरोध नाही, आम्ही सर्व एकाच समाजात राहतो, आम्ही सारे एक आहोत. पण राजकारणासाठी नेतेमंडळी समाज दुभंगण्याचे काम करत आहेत, त्याला आमचा विरोध आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सरकारने अध्यादेश काढला, तेव्हा कोणाही खासदाराने त्याला विरोध केला नाही, याचे दु:ख असल्याचे आयोजकांनी सांगितले,

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)