छत्तीसगडमध्ये भाजपाचे “मिशन 65′ साठी तांत्रिक उपाय….

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमध्ये भाजपाचे “मिशन 65′ साठी तांत्रिक उपाय सुरू झाले आहेत. छत्तीसगडमधील राजकारणात येणाऱ्या नवनवीन बाबांमुळे राजकीय वातावरण तांत्रिक बाबामय होऊ लागले असून एका तांत्रिक बाबाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे मिशन 65 पूर्ण होण्यासाठी तांत्रिक उपाय चालवले आहेत. विधानसभेतील माती आणि मुख्यमंत्री रमण सिंह यांचा फोटो घेऊन तांत्रिक रामलाल काश्‍यप गेला महिनाभर तंत्र साधना करत आहेत.

रामलाल काश्‍यप हे जांजगीर चांपाच्या पामगड विधानसभा क्षेत्रातील मुलमुला गावाचे तांत्रिक आहेत. हे तांत्रिक बाबा भारतीय युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष असून गेली 15-20 वर्षे तांत्रिक उपचार करत आहेत.

-Ads-

आता ते साधना कलश आणि माती घेऊन साधनापूर्तीसाठी आपल्या आठ साथीदारांसह रायपूर-दिल्ली-श्रीनगर फ्लाईटने अमरनाथ यात्रेला जात आहेत. अमरनाथ येथे रात्री 11 ते 12 पर्यंत केलेल्या साधनेनंतर भाजपाला 65 नाही, तर 66 जागा मिळतील आणि मुख्यमंत्री रमण सिंह यांना 4 थ्यांदा मुख्यमंत्री बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि त्यांच्या ,मुख्यमंत्रीपदाला कोणी धक्कासुद्धा लावू शकणार नाही, असा विश्‍वास त्यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)