छत्तीसगडमध्ये पोलीसांबरोबर चकमकीत 14 नक्षली ठार

file photo

सुकमा (छत्तीसगड) – छत्तीसगडमध्ये पोलीसांबरोबर झालेल्या चकमकीत 14 नक्षली ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बस्तरच्या सर्वात संवेदनशील सुकमा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पावसाळ्यात जंगलात प्रथमच मोहिमेवर निघालेल्या सुरक्षा दलांना मोठेच यश मिळाल्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक मीना यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार गोलापली ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सकाळी सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती. शोध मोहिमेत त्यांचा सामना नक्षली टोळीशी झाला. सुमारे तासभर दोन्ही बाजूंनी गोळीबार चालू होता. चकमकीच्या ठिकाणी सुमारे 200 नक्षली उपस्थित होते.मात्र सुरक्षा दलांचे बळ अधिक असल्याचे पाहून नक्षल्यांनी तेथून पळ काढला. या चकमकीत 14 नक्षली ठार झाल्याची आणि एक महिला नक्षली गंभीर जखमी झाल्याची महिती दिली आहे. नक्षलींकडील 16 शस्त्र्रे जप्त करण्यात आली आहेत.

-Ads-

त्वरित आत्मसमर्पण करा, नाही तर सुरक्षा दलांच्या गोळ्यांना सामोरे जा असा इशारा झारखंडचे मुख्यमंत्री डॉ, रमण सिंह यांनी दोनच दिवसांपूर्वी दिला होता. नक्षलींविरुद्ध सुरक्षा दलाने जंगलात घुसून चालवलेल्या जोरदार मोहिमेनंतर अनेक नक्षलींनी आत्मसमर्पण करणे सुरू केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)